आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब मुरकुटे यांची माहिती:पर्यटन विकासासाठी नेवासेला 1 कोटी 61 लाखांचा निधी

कौठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील तिर्थक्षेत्र पर्यटन विकास करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत देवगड, बेल पिंपळगाव, देवगाव, नेवासा, कांगोणी, देडगाव, जेऊर हैबत्ती, गोपाळपूर, येथील तिर्थक्षेत्राचा पर्यटन विकास कामासाठी १ कोटी ६० लक्ष ९९ हजार रु. मंजूर करण्यात आल्याचे मुरकुटे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेचा दुसरा टप्पा मंजूर केला आहे. त्यात देवगड देवस्थान ४०.४० लक्ष, देवगाव, राम मंदिर देवस्थान ४.४४ लक्ष, जेऊर हैबत्ती, यमाई माता देवस्थान १७.९३ लक्ष, देडगाव, बालाजी मंदिर देवस्थान १४.४८ लक्ष, बेलपिंपळगाव, रोकडोबा हनुमान देवस्थान ३२.४९ लक्ष, गोपाळपूर हनुमान मंदिर ६.०१ लक्ष, कांगोणी येथे भवानी माता देवस्थान ६.८४ लक्ष, नेवासा मधमेश्वर देवस्थान ४५.४२ लक्ष निधी आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारच्या विकासात्मक दूरदृष्टीकोनातून हा निधी वितरीत केला. त्याबद्दल सर्व मंत्र्यांचे माजी आमदार मुरकुटे यांनी तालुक्याचे वतीने आभार मानले. नेवासा तालुका हा अध्यात्मिक तालुका म्हणून नाव लौकिकास आहे. तालुक्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर, देवगड, संत ज्ञानेश्वर माऊलींचे नेवासा नावाजलेले तीर्थक्षेत्र आहेत. या निधीमुळे तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा माजी आमदार मुरकुटे यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...