आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवारी (४ फेब्रुवारी) रोजी वीज वितरण कंपनीकडून दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शट डाऊनमुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. शनिवारी मुळा डॅम वाहिनीचे फिडर शिफ्टींग व दुरुस्ती कामासाठी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत शटडाउन घेण्यात येणार आहे.
तसेच या वेळेत महापालिकेमार्फत राबवण्यात येत असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेची कामे, कार्यरत शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाइपलाइन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर भागात सकाळी ११ नंतरचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
हा पाणीपुरवठा रविवारी करण्यात येणार आहे. रविवारी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागातील सिध्दार्थ नगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदीबाजार, कापड बाजार, खिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, तसेच सावेडी, स्टेशन परिसर, आगरकर मळा, विनायक नगर, कायनेटीक चौक परिसर या भागात रविवार ऐवजी सोमवारी पाणी सोडण्यात येणार आहे. सोमवारी पाणीपुरवठा होवू घातलेल्या मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेडींगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको या भागात मंगळवारी पाणी पुरवठा होणार आहे, असे मनपाने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.