आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी दारूच्या अड्ड्यावर छापे:देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, लाख येथे १ लाख ३६ हजारांची गावठी दारू जप्त

राहुरी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जनाच्या दिवशी राहुरी पोलिसांनी देवळाली प्रवरा, राहुरी फॅक्टरी, लाख या गावात छापे टाकून १ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे २ हजार लिटर रसायन व २ हजार ५०० लिटर तयार गावठी दारू जप्त केली. गणेशोत्सव काळात अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी दिल्याने राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी निवडक पोलिस पथकाला घेऊन शुक्रवारी पहाटेच्या वेळात गावठी दारूच्या अड्ड्यावर छापे टाकले.

पोलिसांकडुन जप्त करण्यात आलेली गावठी दारू व दारूचे कच्चे रसायन मुळा नदीपात्रात सोडण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा गावात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तालुक्यात सर्वाधिक दारूचे गुत्ते या भागात सुरू आहेत. अनेकदा छापे टाकून देखील गावठी दारू निर्मिती सुरूच असल्याने या व्यावसायास अभय कुणाचे? असा प्रश्न आहे.

बातम्या आणखी आहेत...