आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:बसमधून प्रवासी महिलेच्या बॅगमधील 1 लाख 70 हजारांचे दागिने लंपास

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर ते राहुरी एसटी बस प्रवासा दरम्यान एका शिक्षक महिलेचे १ लाख ७० हजारांचे ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

शारदा सुनील कुलांगे, राहणार मिरजगाव, ता. कर्जत या शिक्षिका आपल्या मुलीबरोबर मंगळवार १० मे रोजी दुपारी अहमदनगर येथील तारकपूर बस स्थानकातून एमएच १४ बीटी ३५९४ या बसमध्ये बसल्या होत्या. प्रवासा दरम्यान कुलांगे यांनी सोन्याचे दागिने कपड्याच्या बॅगमध्ये ठेवले होते. दुपारच्या वेळेत बस राहुरी बसस्थानकात दाखल झाली असता बॅगमधील १ लाख १० हजार रुपये किंमतीचे ३ तोळे ७०० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ६० हजार रुपये किंमतीचे २ तोळे वजनाचे मिनी गंठण हा १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल अज्ञात भामट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. कुलांगे यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन या घटनेची फिर्याद दिल्याने अज्ञात इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक शिवाजी खरात करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...