आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर:दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या महिलेला १ लाखाची पाणीपट्टी; महापालिकेचा गलथान कारभार काँग्रेसने आणला चव्हाट्यावर

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या केडगावमधील एका विधवा महिलेला मनपाने चक्क १ लाखाच्या पाणीपट्टीचे बिल दिले आहे. मनपाचा हा गलथान कारभार शहर काँग्रेसने समोर आणला आहे. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले.

काळे यांनी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषा भगत, प्रभावती सत्रे, विद्यार्थी काँग्रेसचे अनिस चुडीवाला, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांच्यासह लता नारायण कोरे यांची भेट घेतली. तेथूनच फेसबुक लाईव्ह करून महापालिकेच्या गलथान कारभाराचा त्यांनी पंचनामा केला. लता कोरे यांनीही घडलेला प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरकरांसमोर मांडला आहे.

ज्या मालमत्तेचे बिल त्यांना देण्यात आले आहे, त्या प्रभागात त्यांच्या नावे कुठलीही मालमत्ता नाही. तरी देखील कोरे यांची बुरूडगाव रोड परिसरात मालमत्ता दाखवून सुमारे १ लाख रुपयांची थकबाकीचे बिल त्यांना दिले आहे. एवढे मोठ्या रकमेचा बिल पाहून त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी याबाबत महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याकडे जाऊन विचारणा केली. परंतु त्यांनाच उडवा उडवीचे उत्तरे दिली गेली. कोरे यांनी त्यांच्या मूळ घराची पाणीपट्टीची रक्कम २ हजार १४८ पूर्ण भरलेली आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नसताना ही त्यांना मनपाने सुमारे एक लाख रुपयांची मागणी केल्याने मनपाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...