आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांपर्यंत विविध कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत व अंगणवाडी सेविकांमार्फत गावपातळीवर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यात १ लाख ७२६ एकल असल्याचे समोर आले.
जिल्ह्यातील एकल महिलांचे नियोजनबद्ध सर्वेक्षण करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पुढाकार घेऊन सर्व ग्रामपंचायतींना गावातील विधवा, घटस्फोटीत व परित्यक्ता व स्वेच्छेने अविवाहित राहिलेल्या महिलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने गावातील अशा महिलांची माहिती संकलित केली, त्यात १ लाख ७२६ एकल महिला असल्याचे समोर आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विधवा घटस्फोटीत परित्यक्ता महिलांची इतकी मोठी संख्या यानिमित्ताने प्रथमच एकत्रित प्रशासनाच्या समोर आली. त्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करून विविध योजना राबवणे शक्य होईल.
या सर्वेक्षणाच्या आधारे ८ मे रोजी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी विविध विभागांचे अधिकारी व एकल महिलांसाठी काम करणाऱ्या साऊ एकल समितीचे कार्यकर्ते, महिला स्वयं रोजगारासाठी काम करणाऱ्या संस्था अशी एकत्रित बैठक आयोजित केली होती. त्यात या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृतिकार्यक्रम व प्रकल्प करण्याचे ठरवले.
यावेळी साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, जिल्हा अध्यक्ष अशोक कुटे,मिलिंदकुमार साळवे,कारभारी गरड,नवनाथ नेहे,बाळासाहेब जपे, प्रतिमा कुलकर्णी,रेणुका चौधरी,नितेश बनसोडे हे उपस्थित होते.
कुठे किती एकल महिला विधवा महिलांची मोठी संख्या संगमनेरमध्ये ९ हजार ८१८ आहे. राहाता (८७५४) नेवासा (९५६३) व पारनेर (९०४०) या तालुक्यात आहे. घटस्फोटीत महिलांची सर्वात जास्त संख्या अकोले (१७८७) व शेवगाव (१२६८ ) तालुक्यात आहे. परित्यक्ता महिलांची संख्या अकोले (१६१२) शेवगाव (९७६) व संगमनेर (८३९) तालुक्यात जास्त आहे.घटस्फोटीत व परित्यक्ता यांची संख्या अकोले तालुक्यात जिल्ह्यांत सर्वात जास्त आहे.
नगरच्या धरर्तीवर राज्यात सर्वेक्षण व्हावे राज्यात सर्वात प्रथम झालेल्या या सर्वेक्षणाचे अनुकरण राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, नगर जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातही करायला हवे. एका जिल्ह्यात जर इतकी मोठी संख्या असेल तर राज्यात ही संख्या खूप मोठी असेल तेव्हा संपूर्ण राज्यात हे सर्वेक्षण सरकारने करायला हवे, असे साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.
४० वर्षावरील अविवाहित
महिलांना रोजगार देणे हा उद्देश एकल महिलांची संख्या निश्चित करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ व रोजगार मिळवून देणे हा या सर्वेक्षणामागील हेतु होता. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. या महिलांच्या रोजगारासाठी प्रशासन जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आशीष येरेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.
महिलांना रोजगार देणे हा उद्देश
एकल महिलांची संख्या निश्चित करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ व रोजगार मिळवून देणे हा या सर्वेक्षणामागील हेतु होता. महिलांना स्वत:च्या पायावर उभे करणे हा जिल्हा परिषदेचा उद्देश आहे. या महिलांच्या रोजगारासाठी प्रशासन जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे.
-आशीष येरेकर, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि.प.
नगरच्या धरर्तीवर राज्यात सर्वेक्षण व्हावे राज्यात सर्वात प्रथम झालेल्या या सर्वेक्षणाचे अनुकरण राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, नगर जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातही करायला हवे. एका जिल्ह्यात जर इतकी मोठी संख्या असेल तर राज्यात ही संख्या खूप मोठी असेल तेव्हा संपूर्ण राज्यात हे सर्वेक्षण सरकारने करायला हवे, असे साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.
कुठे किती एकल महिला
विधवा महिलांची मोठी संख्या संगमनेरमध्ये ९ हजार ८१८ आहे. राहाता (८७५४) नेवासा (९५६३) व पारनेर (९०४०) या तालुक्यात आहे. घटस्फोटीत महिलांची सर्वात जास्त संख्या अकोले (१७८७) व शेवगाव (१२६८ ) तालुक्यात आहे. परित्यक्ता महिलांची संख्या अकोले (१६१२) शेवगाव (९७६) व संगमनेर (८३९) तालुक्यात जास्त आहे.घटस्फोटीत व परित्यक्ता यांची संख्या अकोले तालुक्यात जिल्ह्यांत सर्वात जास्त आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.