आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्थानिक गुन्हे:निवडणुकीच्या वादातून झालेल्या खून प्रकरणी 10 आरोपी जेरबंद ; ‘स्थानिक गुन्हे’च्या पथकांची कारवाई

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवराई येथील सोसायटी निवडणुकीतील वादातून झालेल्या खून प्रकरणी १० आरोपींना १२ तासांच्या आत जेरबंद करण्यात आले. पाथर्डी पोलिस, शेवगाव विभागातील पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकत्रित ही कारवाई केली. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात खुनासह आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल आहे. पाथर्डी, शेवगाव, नेवासे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकांनी गुन्ह्याचा सांघिक तपास करत आरोपींची माहिती काढून त्यांचा पाठलाग केला. सोनई, शनीशिंगणापुर, शेवगाव आणि नेवासा पोलिस ठाण्याच्या मदतीने नाकाबंदी केली. पाथर्डी पोलिसांनी सुनिल एकनाथ पालवे, संतोष रामदास पालवे, अंबादास सदाशिव पालवे यांना शिताफीने पकडले. गुन्ह्यातील इतर आरोपी त्यांच्या ताब्यातील फॉर्च्युनर गाडीतून (एमएच १६ बीझेड ३१३१) तिसगाव येथून मिरी, माका, देडगाव, कुकाणे, नेवासे या मार्गाने पळून जात असताना उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी त्यांच्या पथकासोबत तसेच पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी त्यांच्या पथकासोबत व गोपनीय शाखेचे पोकॉ भगवान सानप यांनी खाजगी वाहनाने साधारण दीड ते दोन तास गाडीचा पाठलाग केला. नेवासे पोलिसांच्या पथकाने ही गाडी नेवासे फाटा येथे नाकाबंदी दरम्यान अडवून ताब्यात घेतली व संजय विष्णू कारखेले, आकाश संजय पालवे, सविता अनिल पालवे, अनिल एकनाथ पालवे, दिनकरराव सावळेराम पालवे यांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेने अक्षय संभाजी पालवे याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...