आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवाढ:10 कोटींच्या निधीतील प्रलंबित कामे रद्द होणार? ; अतिरिक्त पैसे देण्यास मनपाचा नकार

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या विशेष निधीतून तत्कालीन युती सरकारने नगर शहरात मंजूर केलेल्या कामांपैकी बहुतांशी रस्त्यांची कामे रखडली आहेत. बांधकाम विभागाने या कामांच्या निविदा सुमारे १४ ते २२ टक्क्यांपर्यंत वाढीव दराने निविदा मंजूर केल्यामुळे व साहित्याच्या दरवाढीमुळे सुमारे पावणे पाच कोटींच्या वाढीव खर्चाचे त्रांगडे निर्माण झाले आहे. वाढीव खर्चाची रक्कम देण्यास मनपाने नकार दिला. उपलब्ध निधीनुसार कामे करावेत व उर्वरित कामे रद्द करावीत, अशी भूमिका घेतल्याची माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली. बांधकाम विभागाने वाढीव दराने निविदा मंजूर केल्यामुळे या कामांसाठी लागणारा अतिरिक्त २.३४ कोटींचा खर्च करायचा कोणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात शुक्रवारी आयुक्त जावळे यांच्या उपस्थितीत मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मनपाकडून कोणताही अतिरिक्त खर्च देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आल्याचे जावळे यांनी सांगितले.

शहरातील ४७ रस्त्यांच्या कामांचा समावेश
शहरातील विविध भागांमध्ये ४७ रस्त्यांची कामे यातून मंजूर आहेत. शासनाकडून ९ कोटी ४७ लाखांचा निधी ६ नोव्हेंबर २०१९ रोजी नगरच्या बांधकाम विभागाकडे वर्ग झाला. बांधकाम विभागाने या कामांसाठी तीन स्वतंत्र निविदा काढून तिन्ही कामे मे. ए. सी. कोठारी या ठेकेदार संस्थेला दिली. या निविदा मंजूर करताना १३.८६ टक्के, १९.५८ टक्के व २१.८० टक्के अशा वाढीव दराने मंजूर केलेल्या आहेत. त्यामुळे या कामांचा खर्च १२.८ कोटींवर पोहचला आहे.

बातम्या आणखी आहेत...