आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी कर्जत, जामखेडला 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती, मतदारसंघातच नागरिकांना मिळणार उपचार

कर्जत/जामखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत असतात. अशातच त्यांनी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांसाठी प्रत्येकी १०० खाटांचे दोन उपजिल्हा रुग्णालय शासनाकडून मंजूर करून आणले. सोमवारी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते कर्जत व जामखेड येथील प्रत्येकी १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा झाला.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या विशेष सहकार्यातून व आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जतमध्ये ४४.८४ कोटी रुपयांचे उपजिल्हा रुग्णालय तर जामखेड येथे ४६.९६ कोटी रुपयांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी वेळोवेळी शासन स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. या भूमिपूजन सोहळ्यानंतर कोंभळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा आणि सीएसआर अंतर्गत दिलेल्या अत्यावश्यक साहित्याचा लोकार्पण सोहळाही आरोग्य मंत्री टोपे यांच्या हस्ते पार पला.

मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करून कायम विकासाचे राजकारण आपण करत राहू असे जनतेला उद्देशून आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवले आहे. तसेच येत्या काळात या दोन्ही रुग्णालयाचा मोठ्या प्रमाणात फायदा मतदारसंघातील नागरिकांना होईल आणि त्यांना गावाच्या बाहेर उपचारासाठी जावे लागणार नाही.

बातम्या आणखी आहेत...