आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निघोज येथे एकाच दिवशी शंभरावर तुळशी विवाह:पुढच्या वर्षी हजार तुळशी विवाह, मळगंगा सामुदायिक मंडळाचा 11 वर्षांपासून उपक्रम

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा तुळशी सामुदायिक विवाह सोहळा मंडळाच्या वतीने शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता शंभर पेक्षा जास्त तुळशी विवाह झाले. मंडळाने गेली ११ वर्षं हा सामुदायिक तुळशी विवाह केला. या तुळशी विवाहाचे पौराहित्य पोपटराव देशपांडे यांनी केले.

जिल्हा परिषद सदस्या लंके म्हणाल्या, गेली ११ वर्षं हे मंडळ सामुदायिक तुळशी विवाह आयोजित करुन एक धार्मिक कार्य करत आहे. आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहे. गाव व परिसर त्यांच्या मागे ठामपणे उभे राहून गावविकासाचे कामे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी सात नंतर संगीत भजनी मंडळ कन्हैया पठारवाडी यांचा संगीत भजणी मंडळाचा कार्यक्रम झाला. कन्हैया संगीत भजनी मंडळाचे मार्गदर्शक

नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उपस्थीतांनी कौतुक केले. सूत्रसंचालन रवी रणसिंग, बबनराव ससाणे यांनी, तर आभार कृष्णा वरखडे, अभिषेक लंके यांनी मानले.

पुढील वर्षी होणार हजारो तुळशी विवाह

मळगंगा तुळशी सामुदायिक विवाह मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ वरखडे यांनी 11 वर्ष राबवलेल्या या सामुदायिक तुळशी विवाह माहिती देऊन पुढील वर्षी तपपूर्ती सोहळा आहे. सात दिवस कीर्तन सोहळा, आठव्या दिवशी तुळशी विवाह, दररोज अन्नदान व महाप्रसाद तसेच नामवंत किर्तनकारांचे किर्तने अशाप्रकारे आयोजन करण्यात येणार आहे. हजारो तुळशी विवाह या सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्यात होणार असल्याची माहिती वरखडे यांनी दिली.

संस्कृती रुजवण्यासाठी महत्त्वपूर्ण

निघोज येथील मळगंगा तुळशी सामुदायिक विवाह सोहळा हा गावचा नावलौकिक वाढवण्यासाठी आणि धार्मिक संस्कृती रुजवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ वरखडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभु श्रीराम भक्त हनुमान यांच्यासमान कार्य केले, असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या सदस्या राणी लंके यांनी काढले.

याप्रसंगी एका दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, राष्ट्रवादी सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे,माजी सभापती सुदाम पवार, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, दत्तात्रय लाळगे, मळगंगा सामुदायिक तुळशी विवाह मंडळ अध्यक्ष सोमनाथ वरखडे, मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार व पारनेर तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक दत्ता उनवणे,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम कळमकर,माजी उपसभापती खंडू भुकन, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे संघटक ॲड बाळासाहेब लामखडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...