आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातबॉम्ब आढळला:नारायण डोहमध्ये आढळला 100 वर्षांपूर्वीचा हॅण्डग्रेनेड

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नारायण डोह गावात रविवारी दुपारी हातबॉम्ब (हॅन्डग्रेनेड) आढळला. हा बॉम्ब सुमारे १०७ वर्षांपूर्वीचा, सन १९१४ मधील व रशियन बनावटीचा असल्याचा अंदाज नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी व्यक्त केला.नारायण डोह गावात अशाच स्वरूपाचा हातबॉम्ब आढळण्याची ही गेल्या वर्षभरातील तिसरी घटना आहे. या संदर्भातील माहिती लष्कराला कळवण्यात आली असून तो निकामी केला जाणार असल्याचे सानप यांनी सांगितले. नारायण डोह गावातील बाबासाहेब फुंदे यांनी त्यांच्या शेतातील मुरूम घरासमोर आणून टाकला.

या मुरुमाच्या ढिगार्‍यात हातबॉम्ब आढळला. त्यांनी यासंदर्भात नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. नगर तालुका पोलिस ठाण्यातील कागदपत्रांच्या माहितीनुसार रशियन बनावटीचा हा १९१४ मधील असावा. यापूर्वीही नारायण डोह परिसरात दोन हातबॉम्ब आढळण्याच्या घटना घडल्या. आजची घटना तिसरी आहे. यापूर्वी एका घटनेत बॉम्बचा स्फोट होऊन एकजण जखमीही झाला होता.नगर तालुका पाेलिसांनी लष्काराच्या अधिकाऱ्यांनीही याबाबत माहिती कळवली होती. त्यांचे बॉम्बनाशक पथकही दाखल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...