आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाडळसरे:वाळू चोरीची खबर देतो म्हणून मांडळ येथे दोन गटात तुफान हाणामारीत 11 जण जखमी, मांडळला छावणीचे स्वरूप, अनेकजण फरार

पाडळसरेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावात पोलिसांची पेट्रोलिंग सुरू, घटनास्थळी तहसीलदारांची भेट

पाडळसरे येथून जवळच असलेल्या मांडळ येथे वाळू चोरीची खबर देतो या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी होऊन सुमारे 11 जण जखमी झाले असून घटना दिनांक 25 रोजी सायंकाळी घडली असून दोन्ही गटातर्फे मारवड पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. मांडळ येथून पांझरा नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या वाळू उपसा सुरू असून मिळालेल्या माहितीवरून पोलीस व महसूल विभागातर्फे कारवाई झाल्याने वाळू चोरांमध्ये नाराजी पसरली होती. त्यात एकमेकांवर संशय घेऊन वाळूची माहिती पुरवतो या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले त्याचे पडसाद झटापटीत होऊन दोन्ही गटातर्फे पांझरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जमाव जमा होऊन एकमेकांना लाकडी दांडके तसेच इतर साहित्याने मारहाण करण्यात आली.

नदी पात्रात तसेच गावात देखील हाणामाऱ्या झाल्या. त्यात काहींचे डोके फुटले तर काहींचे पायावर वार करण्यात आले, काहींना हाताला लागले होते. काही जखमी मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व खाजगी डॉक्टरांकडे उपचारसाठी गेले असता संतप्त जमावाने रुग्णालयाच्या आवारात गर्दी करून दोन खाजगी दवाखान्याची देखील मोडतोड केली आहे. घटनेचे वृत्त कळताच प्रांताधिकारी सीमा अहिरे ,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय राहुल फुला, पीएसआय वैभव पेठकर यांच्या पथकासह महसूल विभागाचे तलाठी तिलेश पवार , प्रकाश महाजन, प्रदीप भदाणे ,सचिन बमनाथ, सतीश शिंदे यांना पांझरा नदी पात्रात पाठवले तोपर्यन्त वाळूचोर ट्रॅक्टर घेऊन पळाले होते.

तर सहाययक पोलीस निरीक्षक राहुल फुला, हवालदार विजय होळकर, संभाजी पाटील, मनोज पाटील, राहुल चौधरी यांनी गावात जाऊन शांतता केली. पोलीसांची कुमक गावात व पांझरा नदीपात्रात दाखल होताच जमाव पांगला होता. सागर अशोक कोळी, पंकज संजय कोळी, विशाल अशोक शिरसाठ, संजय ढोमन कोळी, योगेश हिलाल कोळी, गोकुळ बाबू शिरसाठ, ज्ञानेश्वर प्रकाश कोळी, राकेश वसंत कोळी, अमोल सखाराम कोळी, मका ढोमन कोळी हे 11 जण जखमी झाले असून त्यातील तीन जणांच्या डोक्यावर गंभीर जखमा तर काहींच्या पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. दोन्ही गटातर्फे रात्री उशिरापर्यंत मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलीस उपनिरीक्षक वैभव पेठकर , प्रकाश साळुंखे , संजय पाटील , सुनील अगोने , सुनील तेली , विशाल चव्हाण, भास्कर चव्हाण, सचिन निकम, तुषार वाघ, अनिल राठोड यांच्या पथकाला मांडळ गावात पेट्रोलिंग लावून रात्री आरोपींची धरपकड सुरू होती. घटनेमुळे गावात घबराहट निर्माण झाली होती. पोलिसांनी रात्रीचा मुक्काम मांडळ गावात तंबू लावून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला असून, ग्रामस्थांना धीर देत परत वाद उफाळून आला तर कळक कारवाईची तयारी ठेवली आहे. घटनास्थळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी जाऊन भेट देऊन घटनेचा आढावा घेतला आहे. वाळू चोरांच्या मुजोरीमुळे कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...