आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणुक:राजा ठाकुरविरुद्ध 11 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आर्मी स्टेशन हेडकॉर्टरच्या बनावट ना हरकत (एनओसी) प्रकरणी अटकेत असलेला राजेंद्रसिंग देशराजसिंग उर्फ राजा ठाकूर याचा आणखी एक पराक्रम समोर आला आहे. त्याने सैन्यदलात सफाई कामगाराची नोकरी लावण्याच्या अमिषाने एका व्यक्तीची ११ लाखाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात ठाकूरविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विक्रम विजय छजलाने (वय ३९, रा.हरी मळा, सोलापूर रोड, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे.

राजा ठाकूर याने छजलाने यांना तुमच्या पत्नीस भारतीय सैन्यदलात सफाई कामगार म्हणून नोकरीला लावतो, अशी बतावणी केली. तसेच माझी पत्नी ब्रिगेडीयरची स्वीय सहाय्यक असल्यामुळे माझे सैन्यदलात उच्च अधिकारी परिचित आहेत. आतापर्यंत मी अनेक लोकांची नोकरीची कामे करून दिलेली आहेत. तुमच्या पत्नीला नोकरीला लावण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे छजलाने यांनी सहा लाख रूपये रोख स्वरूपात सन २०१८ मध्ये दिले. उर्वरित पाच लाख रुपये देण्यासाठी फिर्यादी छजलाने यांनी पतसंस्थेत दागिने गहाण ठेवून सोनेतारण कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम भिंगार अर्बन बँकेच्या खात्यात वर्ग झाल्यानंतर फिर्यादी छजलाने यांनी राजा ठाकूर याच्या बँक खात्यात १५ सप्टेंबर २०२० रोजी आरटीजीएसद्वारे रक्कम पाठवली.

त्यानंतर नोकरीकामी वेळोवेळी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरूवात केली. तसेच फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करत तुझ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करेल, तुझ्या मुलाबाळांना जीवे ठार मारेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...