आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदनगर जिल्हा परिषदेच्या जाहीर झालेल्या गट आरक्षणावर विविध पक्षाच्या सदस्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. सोमवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात विविध गटातील 11 हरकती प्राप्त झाल्या आहेत. हरकती नोंदवण्यासाठी मंगळवार शेवटचा दिवस असणार आहे. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव या गटातून सर्वाधिक 4 हरकती प्राप्त झालेल्या आहेत.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 85 गटांची आरक्षण सोडत गुरुवार (28 जुलै) ला जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या गटांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, तहसीलदार वैशाली आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडली होती. या आरक्षण सोडतीत जिल्हा परिषदेच्या 85 गटांपैकी 43 गट हे महिलांसाठी आरक्षित झाले होते. नव्या गट रचनेनुसार राज्यात सर्वाधिक जिल्हा परिषदेचे गट हे अहमदनगर जिल्ह्यात तयार झाले आहेत. आरक्षण सोडतीनंतर 30 जुलैला दोन हरकती प्राप्त झाल्या होत्या तर सोमवार 1 ऑगस्टला दुपारी अडीच वाजेपर्यंत 11 हरकती ग्रामपंचायत विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. अशा एकूण 13 हरकती आतापर्यंत नोंदवण्यात आल्या आहेत.
गटनिहाय हरकती
30 जुलैला आढळगाव गटातून 2 हरकती, 1 ऑगस्टला बारागाव नांदूर, आढळगाव, निंबळक, संवसर, शेंडी, वाकी, धामणवन, टाकळीभान, आढळगाव या गटातून 11 हरकती प्राप्त झालेल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.