आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील एव्हरेस्ट मानले जाणारे १ हजार ६४६ मिटर उंचीचे कळसुबाई शिखर सर करण्याचा निर्धार दिव्यांगांनी केला आहे. राज्यभरातील तब्बल १११ दिव्यांग नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला शिखराची चढाई करणार आहेत. नववर्षाचे हे अनोखे स्वागत जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरला आहे.प्रहार संस्थेचे प्रमुख व राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू नववर्षाच्या या स्वागत मोहिमेत सहभागी होणार आहेत.
या मोहिमेंसाठी १११ दिव्यांगांनी नोंदणी केली असून त्यात २० महिला व १५ अंध व्यक्तींचा समावेश आहे. ३१ डिसेंबरला चढाई सुरू करून, रात्रीचा मुक्काम कळसूबाई शिखरावर तंबूत करतील. या शिखरावरून सूर्योदयासोबत ते नववर्षाचे स्वागत रविवारी (१ जानेवारी) करणार आहेत.
मोहिमेचे नियोजन दिव्यांग योध्दा पुरस्कार प्राप्त गिर्यारोहक केशव भांगरे यांनी आखले आहे. भांगरे स्वत: दिव्यांग गिर्यारोहक आहेत. त्यांनी आतापर्यंत ९१ गड किल्ले सर केले. कळसूबाई शिखर १५ ते २० वेळा त्यांनी सर केले. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या अकोले तालुक्याच्या वैभवात भर घालणारे हरिश्चंद्रगड, रतनगड, पट्टाकिल्ला(विश्रामगड), कोंबडकिल्ला, भैरवगड, घणचक्कर, अलंगगड,मलंगगड, कुलंगगड, पाबरगड व पेमरागड सर करून दूर्ग भ्रमंतीचा छंदही त्यांनी जोपासला. या चढाईतूनच दिव्यांग हतबल नसल्याचा संदेशही त्यांनी दिला.
कळुसबाई शिखरावरुन दिसते धरणांचे वैभव
राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरावरुन विविधतेने नटलेल्या निसर्गसाैंदर्याचे दर्शन घडते. दारणा नदीवरील भावली धरण, इगतपूती तालुक्यातील भाम धरण, दारणा धरण, मराठवाड्यातील सुमारे ५ हजार ५०० हेक्टर क्षेत्राला वरदान ठरणारे वाकी धरण दिसते. त्याचबरोबर नेहमी पर्यटकांनी गजबजलेले भंडारदरा धरण दिसून येते. या शिखरावर गिर्यारोहन करण्यासाठी तीन ते चार तासांहून आिधक कालावधी लागतो. ट्रेकिंगसाठी हेच अंतर ९०० मीटरचे आहे. निसर्ग पर्यटनासाठी अकोले तालुक्यात वर्षभर पर्यटकांची गर्दी होते.
असे आहे मोहिमेचे नियोजन
३१ डिसेंबरला दुपारी १२ वाजता कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी बारी या गावात एकत्र येणार आहेत. शिखर सर केल्यानंतर रात्रीचा मुक्काम कळसूबाई शिखर माथ्यावर होईल. शिवुर्जा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी सुरू केला. यानुसार यंदाचे हे ११ वे वर्ष आहे.
कळसुबाई शिखर दृष्टिक्षेपात
कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १ हजार ६४६ मिटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून ही ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. भंडारदरा धरणापासून हे शिखर सुमारे सहा किलोमिटर अंतरावर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर आहे. शिखरावरून नाशिक जिल्ह्यातील काही धरणे दिसतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.