आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संधी मिळाल्याने गेल्या २ वर्षांच्या कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत १ कोटी १९ लाख २९ हजार रुपयांची विकासकामे पूर्ण करता आली, अशी माहिती सरपंच अनिता किरण उगले यांनी दिली. भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सखाहरी उगले व मळेगावथडी सोसायटीचे माजी अध्यक्ष संतोष दवंगे, उपसरपंच मुकेश चंद्रे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्याने गेल्या २ वर्षांच्या कालावधीत मळेगावथडी पंचकोशीत विविध विकासकामे करता आली.
यामध्ये एकलव्य नगरमध्ये गटार (३ लाख १४ हजार ७०० रुपये), आरओ रोड दुरुस्ती (१ लाख ५० हजार रुपये), जिल्हा परिषद शाळा गावठाण संरक्षक कंपाउंड (२ लाख ५० हजार), गावठाण अंगणवाडी शौचालय (५० हजार), निलाववाडी अंगणवाडी शौचालय (५० हजार), निलाववाडी पिण्यांच्या पाण्यांचा आरओ प्लॅट (५ लाख), जिल्हा परिषद निधी अंतर्गत गावठाण शाळा (२ लाख), पाण्याची टाकी, आदिवासी वस्तीत हायमॅक्स (४ लाख), सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ९ सायकली (४५ हजार), दिव्यांग कल्याण निधीतून रूपाबाई मोरे (५ हजार), किराणा वाटप (३८ हजार), चारी क्रमांक ५ रस्ता (४ लाख ८९ हजार ३११), गावठाण गटार (४ लाख), अंगणवाडी वजनकाटे (४ हजार ८००), सेवकर वस्ती ते दवंगे वस्ती रस्ता (१५ लाख), ४२ घरकुले पूर्ण (प्रत्येकी दीड लाख रुपये प्रमाणे ६३ लाख), बिहार पॅटर्न अंतर्गत स्मशानभूमी परिसरात ४५० झाडांचे वृक्षारोपण, स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालयासाठी ३० लाभार्थ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान वाटप, दवंगे वस्ती ते कदम वस्ती रस्ता (२ लाख ८५ हजार), जिल्हा परिषद शाळेजवळील गटार (३ लाख), जिल्हा परिषद शाळा दवंगे वस्ती स्वच्छ भारत अंतर्गत स्वच्छतागृह (३ लाख १० हजार), बडदे शिंदे वस्ती पेव्हींग ब्लॉक २ लाख खर्चाची कामे मार्गी लागली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.