आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलथान कारभार:120 धोकादायक इमारतींना मनपाच्या केवळ नोटिसाच; घोषित सात पैकी एकाही इमारतीवर कारवाई नाही

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा तोंडावर आला असतानाही ही अद्याप महापालिकेचे धोकादायक इमारतींवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ७ व नोटिसा बजावण्यात आलेल्या १२० पैकी एकाही इमारतीवर महापालिकेकडून कारवाई झालेली नाही. नोटिसा बजावूनही काही मालमत्ताधारकांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही.

शहराच्या मध्यवर्ती परिसरात अनेक जुने वाडे व इमारती आहेत. त्यातील अनेक इमारतींची दुरवस्था झालेली आहे. काही जुने वाडे मोडकळीस आलेले आहेत. तर अनेक बांधकामे ४० ते ५० वर्षांपूर्वीची आहेत. पावसाळ्यामध्ये अशा जुन्या इमारती खचण्याची अथवा पडण्याची अधिक भीती असते. महापालिकेने शहरातील अशा इमारतींचे सर्वेक्षण करून १२० इमारत मालकांना नोटिसा बजावलेल्या आहेत. संबंधितांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून ते महापालिकेत सादर करणे अपेक्षित आहे. मात्र, एकाही मालमत्ता धारकाकडून महापालिकेत स्ट्रक्चरल ऑडिट सादर झालेले नाही.

तसेच महापालिकेने यापूर्वी १२ इमारती धोकादायक असल्याचे व त्या तात्काळ उतरवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापैकी अद्यापही ७ इमारतींवर कारवाई झालेली नाही. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून जीवित अथवा वित्तहानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मनपाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अशा इमारती रिकाम्या करणे आवश्यक आहे.

मालक-भाडेकरू वादात तक्रारी
शहरातील अनेक जुन्या इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात भाडेकरूंचे वास्तव्य आहे. मोडकळीस आलेल्या काही इमारतींमध्ये भाडेकरूंचे वास्तव्य असून, ते जागा खाली करत नसल्याने जागामालकच मनपात इमारत धोकादायक असल्याची तक्रार करत असल्याचे समोर आले आहे. जागा मालक व भाडेकरूंच्या वादात कारवाई होत नसल्याने अनेक धोकादायक इमारती आजही शहरात उभ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...