आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:एडस बाधितांच्या वधू-वर मेळाव्यात 120 जणांची नोंदणी

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, जिल्हा रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतीबंधक व नियंत्रण विभाग, एआरटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एचआयव्ही, एड्स संसर्गीतांसाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात राज्यभरातून १२० जणांनी नोंदणी केली आहे. एचआयव्ही एड्स संसर्गीतांच्या मनातील घुसमट काढण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुकर होण्याकरिता त्यांच्या परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते.

यावेळी प्रतिभा गांधी, अलका मेहता, एआरटी विभागाचे डॉ. विक्रम पानसंबळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, वैष्णवी सवई, स्नेहाधारचे संचालक ॲड. श्याम असावा, हनीफ शेख आदी उपस्थित होते. स्नेहालय संस्था पुढाकार घेऊन एचआयव्ही बाधित सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींना आधार देत आहे. मेळाव्यात विविध जिल्ह्यातून व राज्यातून एकूण १२० जणांनी नोंदणी केली, असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी सांगितले.एचआयव्ही बद्दल आजही समाजात नकारात्मतेची भावना आहे.

त्यामुळे हा आजार असलेले रुग्ण समाजापासून वेगळे पडतात काही वेळा या आजारात जोडीदार गमावला जातो लहान वयात आजार झाल्याने पुढचे संपूर्ण आयुष्य एक त्याने काढावे लागते त्यामुळे जोडीदार शोधण्यास स्नेहालय संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून कार्य करत आहे असे मा. डॉ. विक्रम पांनसंबळ यांनी सांगितले.

सूत्रसंचालन हिना शेख यांनी तर विद्या घोरपडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निदा सय्यद, प्रवीण धाड, कावेरी रोहकल, नुपूर खंडागळे, नीता पटेकर, नितीन सुपेकर, सागर फुलारी, नितीन पवार, सिमला गायकवाड, दीपक माळवे, दीपक बुरम, आकाश काळे आदींनी परिश्रम घेतले.

एआरटी उपचारामुळे आयुष्यमान वाढले
एचआयव्हीग्रस्त रुग्णांना एआरटी उपचारातून बरे केले जाते. औषधामुळे एचआयव्ही संसर्गित लोकांचे आयुष्यमान वाढले असून ते सामान्य माणसाप्रमाणे काम करू शकतात व समाजात वावरू शकतात. या उपचार पद्धतीमुळे एचआयव्हीग्रस्तांचे आयुष्यमान वाढले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...