आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून श्रीगोंदे नगर तालुक्यातील ४१ गावांच्या एकूण ४९.५ कि.मी. पानंदरस्त्यांसाठी १२ कोटी ३७ लाख रुपये निधी मंजूर झालेला आहे. हे रस्ते मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्रीश्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आमदार बबनराव पाचपुते यांनी आभार मानले.
श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज, आनंदवाडी, आर्वी, कणसेवाडी,काष्टी, कौठा, गार,निमगाव खलु, पारगाव सुद्रिक, पेडगाव, बेलवंडी, भानगाव, येळपणे, लिंपणगाव, वांगदरी, वेळू, हंगेवाडी, कोकणगाव व मढेवडगाव. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील, आगडगाव, कोल्हेवाडी, गुंडेगाव, गुणवडी, पारगाव भातोडी, मदडगाव, मांडवे, वाटेफळ, साकत, सारोळा बद्दी, हातवळण या गावांमधून वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या ४१ पानंद रस्त्यांचा समावेश या कामात आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी आख्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हामी योजनेंतर्गत, मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजनेतून सन २०२२-२३ वर्षातील पुरवणी आख्यात या रस्त्यांना शासनामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे.
शिंदे फडणवीस सरकार हे लोकाभिमुख काम करणारे सरकार आहे. श्रीगोंदे-नगर मतदार संघातील विकास कामांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शासनातील मंत्री महोदय नेहमी सकारात्मक राहून भरीव निधीची तरतूद करत अाहेत. यापुढेही मतदारसंघात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.