आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:‘संजीवनी’चा 12 वीचा निकाल 100 टक्के ; वाणिज्य शाखेत फहिम मोहिन खानला 93.50 टक्के

कोपरगाव शहर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२२ मध्ये घेतलेल्या इ. १२ वी च्या परीक्षांचे निकाल मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर झाले आहे. यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेत फहिम मोहिन खान याने ९३. ५० टक्के तर विज्ञान शाखेत सार्थक विरेंद्र जोशी याने ९२. ५० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासुन सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली , अशी माहिती कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पत्रकात म्हटले आहे की विज्ञान शाखेत तेजस विकास चौधरी याने ९२. ३३ टक्के गुण मिळवुन दुसरा तर पार्थ सोमनाथ गायकवाड याने ९१. ५० टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत इशिता संदीप कानकुबजी व प्रथमेश दिपक सोनार यांनी प्रत्येकी ९२. ०२ टक्के गुण मिळवुन दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला तर अनुज जितेंद्र देशपांडे व स्नेहल रतन गायकवाड यांनी प्रत्येकी ९२ टक्के गुण मिळवुन तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले विज्ञान शाखेत एकूण १९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळकवले. १२० विध्यार्थी ८० ते ८९ टक्केवारी मध्ये आहेत. ६१ विध्यार्थी ७० ते ७९ टक्केवारीच्या रेंजमध्ये आहेत. तर फक्त ५ विध्यार्थी ६० ते ६९ टक्केवारी मध्ये आहेत. एकुण ९४ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेची परीक्षा दिली. यात ८ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ५८ विद्यार्थी ८० ते ८९ टक्केवारीच्या ग्रुपमध्ये उत्तिर्ण झाले. २५ विध्यार्थी हे ७० ते ७९ टक्केवारी मध्ये उत्तीर्ण झाले.

बातम्या आणखी आहेत...