आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:दुचाकी चोराकडून बुलेटसह 13 दुचाकी हस्तगत

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व उपनगरातून दुचाकी चोरून त्या बीड जिल्ह्यात विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. किसन ऊर्फ कृष्णा पोपट सापते (वय २६, रा. खकाळवाडी, ता. आष्टी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून बुलेटसह १३ दुचाकी हस्तगत केल्या. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

२८ एप्रिल रोजी दुपारी किसन सापते याने प्रोफेसर कॉलनी चौकातून सुनील भानुदास सरोदे यांची बुलेट दुचाकी चोरली होती. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी तोफखाना पोलि लस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती सापते याला समजल्याने त्याने सरोदे यांची दुचाकी भिंगारमध्ये सोडून तो पसार झाला होता. मात्र, तोफखाना पोलिस त्याच्या मागावर होते.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपअधीक्षक अनिल कातकडे, निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके, अंमलदार दत्तात्रय जपे, संतोष गोमसाळे आदींच्या पथकाने आरोपी सापते याला बीड जिल्ह्यातून अटक केली.

७० ते ८० हजारांना दुचाकीची विक्री
किसन सापते हा वाहन-खरेदी विक्रीचा व्यावसाय करत होता. त्याची बीड जिल्ह्यात ओळख होती. या ओळखीतून चोरीच्या दुचाकी त्याने ७० ते ८० हजार रूपये किमतीला जवळच्या नातेवाईक, मित्र-परिवारात विक्री केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी दुचाकी जप्त केल्याने चोरीच्या दुचाकी घेणाऱ्यांचीही फसवणूक झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...