आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्याद:घरफोडीत 13 तोळे दागिन्यांसह पावणे तीन लाखांची रोकड लंपास

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाराबाभळी (ता. नगर) येथील गणेशनगरमध्ये तिघांनी एका व्यावसायिकाचे घर फोडून २ लाख ७० हजार रूपयांची रोख रक्कम, सुमारे १३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व इतर चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

याप्रकरणी २० डिसेंबर रोजी दुपारी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक लक्ष्मण काशिनाथ डोंगरे (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. ज्ञानेश्‍वर ऊर्फ ज्ञाना भताने, गणेश लक्ष्मण देवकर, पंकज दत्तात्रय पालवे (सर्व रा. मेहकरी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. वरील तिघांनी लक्ष्मण डोंगरे यांच्या राहत्या घरात १७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री पावणे बारा वाजेच्या दरम्यान प्रवेश करून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...