आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहाता बाजार समितीत 13049 क्रेट डाळिंबाची आवक:प्रतिकिलाे 188 रुपयांपर्यंत भाव; सोयाबीन, गहू, हरभऱ्यालाही चांगला भाव

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (17 ऑगस्ट) 13 हजार 49 क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. सायंकाळी झालेल्या लिलावात एक नंबरच्या डाळिंबाला सर्वाधिक प्रतिकिलो 111 ते 188 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो 76 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. दरम्यान, राहाता बाजार समितीत डाळिंबासह गहू, सोयाबीन, हरभरा, ज्वारी व बाजरी आदी शेतमालांची आवक झाली होती, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

नगर जिल्ह्यात विविध फळबागांखालील क्षेत्र 76 हजार 172 हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक 37 हजार 677 हेक्टर क्षेत्र डाळिंब बागाखालील आहे. राहाता बाजार समितीत शनिवार वगळता दररोज डाळिंबाचे लिलाव होतात. राहाता बाजार समितीत बुधवारी शेतकऱ्यांनी 13 हजार 49 क्रेट डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो सर्वाधिक 111 रुपये ते 188 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 76 ते 110 रुपये, तीन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 36 ते 75 रुपये, तर चार नंबर दर्जाच्या डाळिंबांना प्रतिकिलो 10 ते 35 रुपयांपर्यंत भाव मिळाला. राहाता बाजार समितीत मागील आठवड्यापासून भावात किंचीत चढउतार होत आहे.

इतर शेतमालांची झाली आवक

राहाता बाजार समितीत बुधवारी इतर शेतमालांचीही आवक झाली होती. यामध्ये गव्हाची आवक 11 क्विंटल आवक झाली होती. यावेळी गव्हाला प्रतिक्विंटल 2400 रुपयांपर्यंत भाव मिळाला. यावेळी 49 क्विंटल सोयाबिनची आवक झाली होती. सोयाबिनला प्रतिक्विंटल किमान 6042, कमाल 6065 रुपये भाव मिळाला. हरभऱ्याची 8 क्विंटल आवक झाली होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटल 4177 ते 4555 रुपये भाव मिळाला. ज्वारीची 20 क्विंटल आवक झाली होती, यावेळी ज्वारीला प्रतिक्विंटल 2970 रुपये भाव मिळाला. यावेळी 52 क्विंटल बाजरीची आवक झााली होती, यावेळी बाजारीला प्रतिक्विंटल 2151 ते 2736 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...