आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीची मागणी:133 रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी करा; काँग्रेसची नगर विकास प्रधान सचिवांकडे मागणी, अनेक रस्त्यांची कामे दर्जाहीन

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा आयुक्तांनी महिनाभरापूर्वी नगर शहरात १३३ रस्त्यांची कामे झाल्याचे स्पष्ट करून यादी जाहीर केली. आता काँग्रेसने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याकडे या सर्व रस्त्यांच्या कामाची गुणवत्तेसह रस्ते यंत्रणेकडून तपासणी करण्याची मागणी केली.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले, मनपाने जारी केलेल्या त्या १३३ रस्त्यांबाबत काँग्रेसचे आक्षेप नगर विकास प्रधान सचिवांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी ओबीसी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे उपस्थित होते. यादीतील अनेक रस्त्यांची नावे दुबार जाहीर आली आहेत. त्यामुळे या रस्त्यांची कामे तोंडा करून दोन वेळा बिले काढली आहेत काय?, या रस्त्यांच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाला आहे किंवा काय, असा सवालही सचिवांसमोर समोर उपस्थित केला. अनेक रस्त्यांची कामे दर्जाहीन झाली आहेत. त्यामुळे या कामांच्या निविदा, वर्क ऑर्डर, एम. बी. रेकॉर्ड, गुणवत्ता प्रमाणपत्र या सर्व प्रक्रियासह, प्रत्यक्ष झालेल्या कामाची चौकशी झाली पाहिजे. ज्या यंत्रणेने या १३३ कामांसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र दिले, त्यांनी दिलेली गुणवत्ता प्रमाणपत्र ही योग्य आहेत की नाही, याची तपासणी करून चौकशी करावी, अशी मागणी केली.

निविदा रद्द करा : काळे
स्वस्तिक चौक ते धार्मिक परीक्षा बोर्ड या सुस्थितीत रस्त्याची सुमारे साडेचार कोटींची निविदा काढली. काँग्रेसने यावर आक्षेप घेत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. ही बाब काळे यांनी प्रधान सचिव महेश पाठक यांच्या निदर्शनास आणून निधीचा अपव्यय होणार नाही, याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...