आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:कोपरगाव बसस्थानक व व्यापारी संकुलासाठी 14 कोटींचा निधी; आमदार आशुतोष काळे यांची माहिती

कोपरगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिण्याच्या पाण्याची वानवा असलेल्या कोपरगाव शहराची रस्त्यांमुळे दुरवस्था होऊन धुळगाव, टपऱ्यांचे शहर अशा अनेक उपाध्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विकासाच्या बाबतीत मागे असलेले कोपरगाव शहर अशी कोपरगावची ओळख होऊन बसली होती. मात्र श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून ही ओळख पुसली जात असून त्यांच्या भगीरथ प्रयत्नातून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे, शहरात नवीन रस्ते तयार झाले आहेत. बस आगार इमारत पुनर्बांधणी व स्थानकालगत व्यापारी संकुल उभारण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून तब्बल १४ कोटींचा निधी व्यापारी संकुलासाठी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव शहरासाठी २६८ कोटी निधी आणला. कोपरगाव शहराचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी १३१.२४ कोटी निधी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी दिला. त्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम होऊन बाजारपेठेला आलेली मरगळ याची दखल घेऊन शहरातील रस्ते व सुशोभीकरणासाठी देखील कोट्यवधी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहर शहराचे रूपडे बदलू लागले.

कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा, रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच कोपरगाव बस स्थानकात व्यापारी संकुल उभारले जाऊन स्थानिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला होता. एप्रिल महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार कोपरगाव दौऱ्यावर आले असता आमदार काळे यांनी बसस्थानका लगतच्या व्यापारी संकुलासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली होती. त्या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी निधी देण्याची ग्वाही आमदार काळे यांना दिली होती.

बातम्या आणखी आहेत...