आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पी:एका दिवसांत लम्पीमुळे 15 जनावरांचा मृत्यू

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात लंपीचा फैलाव वेगाने होत असून आतापर्यंत तब्बल १ हजार ३६६ जनावरांना लंपीची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. बुधवारी (२१ सप्टेंबर) पशुसंवर्धन विभागाकडे ३९ जनावरे मृत झाल्याची नोंद होती, त्यात गुरुवारी अधिक वाढ होऊन मृत जनावरांची संख्या आता ५४ झाली आहे. एकाच दिवसांत १५ जनावरांचा मृत्यु होणे ही बाब चिंता वाढवणारी आहे. जिल्ह्यात लंपी त्वचारोगामुळे बाधीत होणाऱ्या जनावरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

जिल्हा पशुसंवर्धन विभाग तसेच जिल्हा परिषदेने लसीकरणावर भर दिला आहे. ज्या भागात जनावरे बाधीत आढळून आले आहेत, त्या परिसरात पाच किलोमिटर अंतरावरील तब्बल ६ लाख ४ हजार ९७१ जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यँत १६४ गावांत १ हजार ६५६ जनावरांना लंपीची बाधा झाली आहे, त्यातून ५५५ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तसेच ५४ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...