आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:नगर-पुणे महामार्गावरील एसटी बस- कंटेनरच्या अपघातात 15 जण जखमी

पारनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरहून पुण्याकडे निघालेल्या अमळनेर-पुणे बसला अचानक छोटा हत्ती वाहन आडवे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून एसटी बस कंटनेरला धडकली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी एक वृध्द महिला गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आलेे. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारात हा अपघात झाला.

अपघातासंदर्भात वाघुंडे खुर्दचे सरपंच संदीप वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघुंडे येथील चौकामध्ये पुढे चाललेल्या छोटा हत्ती टेम्पो पाठीमागून येणाऱ्या अमळनेर-पुणे एसटी बसला (एमएच०६-८७३०) ला आडवे आला. त्यात एसटी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बाजूने जाणाऱ्या कंटेनरला बसची धडक बसली. त्यात १५ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती आमदार नीलेश लंके यांना समजल्यानंतर वाघुुंड्याचे सरपंच संदीप वाघमारे, माजी सरपंच संदीप मगर तसेच नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून अपघातग्रस्त प्रवाशांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत बससधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यानच्या काळात आ. नीलेश लंके यांनीही १०८ रुग्णवाहिका व्यवस्थापनाशी संपर्क करून तत्काळ अपघातस्थळी रुग्णवाहिका पाठविण्याची सूचना दिल्या. १०८ प्रशासनानेही घटनास्थळी तीन रुग्णवाहिका पाठवून जखमींना सुपे तसेच पारनेर येथील रुग्णालयात भरती कले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून दूर करीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.

बातम्या आणखी आहेत...