आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावा जप्त:नगर शहरात 15 किलो मावा जप्त ; मावा विक्री करणार्‍या टपरीवर छापा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मावा विक्री करणार्‍या टपरीवर छापा टाकून १५ हजार रूपये किंमतीचा १५ किलो मावा जप्त केला आहे. गुरूवारी रात्री सिताराम सारडा विद्यालयाजवळ शितळादेवी माता चौकातील हनुमान पान टपरीवर पोलिसांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी अजिंक्य धनेश नामदे (वय २० रा. आनंदीबाजार, नगर) याच्याविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार कमलेश पाथरूट यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार संदीप पवार, लक्ष्मण खोकले, दत्तात्रय शिरसाठ, पाथरुट यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...