आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वर्षांपासूनचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटल:15 हजार दाखले ऑनलाईन झाले तयार; संवत्सर जि.प. शाळेचा अभिनव उपक्रम

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शंभर वर्षांपूर्वी शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची दाखले डिजिटल करण्याचा अभिनव उपक्रम अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या संवत्सर येथील शाळेने राबवून एक अभिनव उपक्रम केला आहे.

या उपक्रमामुळे एका क्लिक मध्ये विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळतो. आतापर्यंत 15 हजार 147 दाखले ऑनलाईन झाले तयार झाले असून, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांच्या संकल्पनेतून उपक्रम हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ‘संवत्सर’ येथील जिल्हा परिषद शाळेने ‘शाळा सोडल्याचा दाखला’ डिजिटलरित्या जतन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. या शाळेने 1908 पासूनचे शाळेचे दाखले डिजिटल केल्यामुळे शंभर वर्षापूर्वीचा दाखला क्षणाचा विलंब न होता एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत.

‘संवत्सर’ जिल्हा परिषद शाळेच्या अखत्यारित विविध वाड्या-वस्त्यांवरील 8 जिल्हा परिषद शाळा आहेत. ‘संवत्सर’ व उर्वरित 8 जिल्हा परिषद शाळांनी 1908 पासून ते आजपर्यंत प्रवेश घेतलेल्या 15 हजार 147 विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले डिजिटलरित्या जतन करून ठेवले आहेत. पुण्याच्या ‘ई-प्रशासन सॉफ्टवेअर’ या कंपनीच्या मदतीने ‘संवत्सर’ शाळेने जिल्ह्यात प्रथमच नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमास जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांचे पाठबळ लाभले आहे. त्यांच्याच प्रयत्नातून लोकसहभाग उपलब्ध झाला आहे.

‘संवत्सर’ शाळेचे मुख्याध्यापक फैयाजखान पठाण यांच्यासह इतर आठ शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांचे विशेष योगदान लाभले आहे. संवत्सर गावातील शाळेत 6,852, दशरथवाडी-2465, निरगुडेवस्ती-2008, परजणेवस्ती-1171, कोद्रेवस्ती-1410, बिरोबा चौक- 520, औद्योगिक वसाहत-210, मनाईवस्ती -417 व वाघीनाला -112 असे 15 हजार 147 दाखल ऑनलाईन झाले आहेत.

डॉ. वेणूगोपाल राव यांचे अध्यक्षतेखाली लोकसभेच्या 11 खासदारांच्या संसदीय स्थायी समितीने शाळेला भेट दिली होती. राज्याचे तत्कालीन प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी शाळेला भेटी दिल्या आहेत. सध्याचे नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शाळेला भेटी दिली होती. असे सदस्य राजेश परजणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...