आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुरी:बडतर्फ एपीआयचा 15 वर्षीय मुलीस ओलीस ठेवून गोळीबार, पोलिस उपअधीक्षक बालंबाल बचावले

राहुरी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडतर्फ सहायक पोलिस उपनिरीक्षकाने १५ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. कट्ट्यातून सुटलेल्या गोळीची दिशा बदलल्याने श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके बालंबाल बचावले. हा खळबळजनक प्रकार गुरुवारी सकाळी राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे घडला.

आरोपी सुनील लक्ष्मण लोखंडे (वानवडी, पुणे) याने गुरुवारी सकाळी डिग्रसमध्ये महिलेच्या बंगल्याच्या मागील बाजूस आपली कार (एमएच १२ जेझेड ४३२८) पार्क करून भिंतीवरून बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. जिवाच्या भीतीने महिलेने घराचा दरवाजा बंद केला. लोखंडेने महिलेच्या १५ वर्षीय मुलीस ओलीस ठेवून गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सुनील लोखंडे त्यांनाही कट्ट्याचा धाक दाखवला. याची माहिती कळताच श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, राहुरीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.

मुलीस ओलीस ठेवणाऱ्या लोखंडेची पोलिसांनी मेगाफोनद्वारे समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती व्यर्थ ठरला. पोलिस अधिकाऱ्यांच्या झटापटीत लोखंडे याच्याकडून गावठी कट्ट्याचे ट्रिगर दाबले गेले. यात पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके बालंबाल बचावले. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके, पोलिस काॅन्सटेबल राठोड, पारधी व इतर पोलिस पथकाने सुनील लोखंडेवर झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत.

दोन वेळा गोळीबार
बडतर्फ एपीआय लोखंडेकडून गावठी कट्ट्यातून दोनदा गोळीबार केला. पहिला गोळीबार महिलेला धमकावण्यासाठी व दुसरा पोलिसांच्या झटापटीत झाला. झडतीत त्याच्याकडे एक वॅगनआर कार, दोन गावठी कट्टे आढळून आले. हे कट्टे मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश भागातील असल्याचा संशय आहे. लोखंडेवर खुनाचा प्रयत्न, ओलीस ठेवणे, आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...