आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण पुरक गणपती बनवा कार्यशाळेत सहभाग:भगवती माता विद्यामंदिर येथील गणपती बनवा कार्यशाळेमध्ये १५० विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवतीपूर येथील भगवती माता विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक मातीचे गणपती बनवले. त्यामध्ये शाडू माती, झाडांची पाने यांचा वापर करून विविध डाळीपासून त्याचप्रमाणे घरातील टाकाऊ वस्तूपासून गणपती मूर्ती बनवल्या. व्हाया पिठापासून विद्यार्थ्यांनी सुंदर अक्षय गणपती बनवले. या विद्यार्थ्यांनी विविध सुबक मूर्ती बनवल्या आहेत. याच मूर्तीची ती आपल्या घरात प्रतिष्ठापना करणार आहेत.

गणपती सजावटीसाठी लागणारे सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः घरातील टाकाऊ वस्तूंपासून किंवा विविध कागदांपासून बनवलेले आहे. यावेळी १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक गणपती बनवा कार्यशाळेत सहभाग नोंदवला. या सर्व चिमुकल्यांनी बनवलेल्या कलाकृतींची पाहणी करताना विद्यालयाच्या प्राचार्य कुमकर, शिक्षक भालेराव, कदम, कळसकर, शिक्षिका दिघे, मोरे आदी उपस्थित होते. कलाशिक्षक किशोर आहेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...