आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व जनावंराच्या लसीकरणाची मागणी:नेवासे तालुक्यामध्ये लम्पी आजाराची लागण झालेली 16 जनावरे आढळली; आपत्ती लसीच्या तुटवड्यामुळे पशुपालक हैराण

नेवासे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात जनावरांचा लम्पी त्वचारोगाचा शिरकाव झाला असून पाच ते सहा गावांमध्ये १६ जनावरे सापडली आहेत. विशेष म्हणजे तालुक्यामध्ये या रोगावरील लस उपलब्ध नसल्याने पशुपालक शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.नेवासे तालुक्यात गळलिंब, गोगलगाव, नेवासे बुद्रुक, देवसडे, तेलकुडगाव, लेकुरवाळी, आकडा आदी गावांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झालेली १६ जनावरे आढळली आहेत. या जनावरांना लम्पी रोगाची लागण झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या गावच्या पाच किलोमीटर परिसरात असलेल्या जनावरांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. नेवासे तालुक्यात १ लाख ५२ हजार जनावरे असून शंभर टक्के लसीकरणासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत.

परंतु लसीच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नेवासे तालुक्याला आतापर्यंत केवळ ८ हजार ५०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. देवसडे व गळनिंब परिसरातील जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. हा रोग व्हायरस असून यामुळे जनावरांच्या नाका, तोंडातून सुरुवातीला पाणी येते. जनावरांना ताप येतो. जनावरांच्या अंगावर गाठी येतात. त्यावर जखमा होतात. याचा प्रसार माशा, गोचीड याद्वारे होतो. त्यामुळे गोठे स्वच्छ ठेवावेत तसेच कडूलिंबाच्या पानांचा संध्याकाळी गोठ्यामध्ये धूर करावा. आजारी जनावरे वेगळी ठेवावीत. या रोगामुळे दुधाचे प्रमाण घटते. गर्भपात होण्याची शक्यता असते, अशी लक्षणे दिसतात. शेतकरी वर्ग पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे धाव घेत आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याने शेतकरी हतबल आहेत. पशुपालकांनी दक्षता घेताना गाई आणि म्हशी एकाच गोठ्यात बांधू नये व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लसीकरण करावे, हाच यावर उपाय आहे, असे डॉ. अशोकराव ढगे यांनी सांगितले.

घोडेगाव येथे भरणारा जनावरांचा बाजार बंद
नेवासे तालुक्यातील या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात प्रसिद्ध असलेला घोडेगावचा जनावरांचा शुक्रवारचा बाजार बंद ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे जनावरांचा घोडेगावचा बाजार बंद राहणार आहे, असे नेवासे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी दिनेश पंडुरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...