आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेवगांव व पाथर्डी तालुक्यातील नवीन ५९ तलाठी कार्यालयाच्या बांधकामासाठी रु. १५ कोटी ७५ लक्ष मंजूर झाल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. यामध्ये शेवगांव तालुक्यातील ३४ गांवातील तलाठी कार्यालय बांधकामासाठी ९ कोटी १८ लक्ष व पाथर्डी तालुक्यातील २५ गावांतील तलाठी कार्यालयासाठी रु. ६ कोटी ५७ लक्ष रक्कम मंजूर झाली आहे. या कामासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला हाेता.
सर्व प्रस्तावांना शासन निर्णयानुसार महसूल विभागाने मंजुरी दिली. यात शेवगांव तालुक्यातील वरुर बुद्रुक, अमरापुर, खरडगांव, ठाकुर निमगांव, कोळगांव, आखेगांव, जोहरापुर, देवटाकळी, शहरटाकळी, भाविनिमगांव, दहिगांवने, बोधेगांव, लाडजळगांव, राणेगांव, गोळेगांव, बालमटाकळी, कांबी, हातगांव, खडके, मुंगी, आंतरवाली बु., ठाकुरपिंपगांव, राक्षी, ढोरजळगांव शे, ढोरजळगांवने, सामनगांव, आव्हाणे बु., वाघोली, निंबे, दहिफळ, खुंटेफळ, खानापुर, गदेवाडी, घोटणा यांचा समावेश आहे.
तर पाथर्डी तालुक्यातील सांगवी बु., मढी, निंवडूगे, साकेगांव, पाडळी, आल्हणवाडी, जाटदेवळे, चिंचपुर इजदे, करोडी, कारेगांव, टाकळीमानुर, अकोला, चिंचपुरपांगुळ, जांभळी, येळी, भालगांव, सुसरे, दुलेचांदगांव, निपाणी जळगांव, लोहसर, मोहोज बु., मांडवे, शिराळ, आडगांव, कासारपिंपळगांव या गांवाचा तलाठी कार्यालय बांधकामाकरीता समावेश आहे. ग्रामीण भागात तलाठी शासन व नागरिक, शेतकरी यांच्यामधील महत्त्वाची भूमिका निभावत असतो. जमिनी संबंधित अभिलेखन सतत अद्यावत राहावीत तसेच वेगवेगळ्या नोंदीसाठी नागरिकांना नेहमीच तलाठी कार्यालयाची आवश्यकता भासते. गावात तलाठी कार्यालय झाल्याने सामान्य नागरिकांचे कामकाज सोयीस्कर होण्यास नक्कीच मदत होईल. गेले अनेक वर्षापासून या गावात तलाठी कार्यालय इमारत नसल्याने गैरसोय होत होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.