आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँकेच्या काष्टी शाखेतील प्रकार:खोट्या सह्या करून 16 लाखांची फसवणूक

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काष्टी येथील जिल्हा बँकेच्या काष्टी शाखेत सहकार महर्षी काष्टी सेवा सोसायटीचे संचालक अॅड. विठ्ठलराव जगन्नाथ काकडे यांनी २ सप्टेंबर २०२२ रोजी कुटुंबातील ११ व्यक्तींच्या बोगस व बनावट सह्या करून कॅशियर आप्पासाहेब गोपाळघरे यांना दमबाजी करून जबरदस्तीने बँकेतून १६ लाख ९७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. या संदर्भात कॅशियर गोपाळघरे यांनी पुणे येथे सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार करुन काकडे यांना सहकार महर्षी काष्टी संस्थेतून निलंबित करण्याची मागणी करुन पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक कर्जत व तालुका विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केल्याने काष्टीत खळबळ उडाली आहे.

सहकार महर्षी काष्टी संस्थेचे माजी अध्यक्ष विद्यमान विठ्ठलराव काकडे यांनी घरातील ११ सदस्यांच्या नावे संस्थेतून कर्ज घेतले ती कर्जाची रक्कम घेण्यासाठी काकडे जिल्हा सहकारी बँकेत गेले. आणि कॅशियर आप्पासाहेब गोपाळघरे यांच्याकडे पैशाची मागणी केली. कॅशियर गोपाळघरे म्हणाले, तुम्हा एकट्या व्यक्ती जवळ सर्व सदस्यांची रक्कम बँकेच्या नियमानुसार देता येणार नाही. यासाठी घरातील सर्व सदस्यांना सही करण्यासाठी बँकेत आणावे लागेल. तेव्हाच रक्कम मिळेल असे म्हणताच काकडे याचा पारा चढला आणि कॅशियरला म्हणाले मी कोण आहे तुला माहिती आहे का मी सहकार महर्षी काष्टी संस्थेचा माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आहे. याची जाणीव ठेव, तुमची जिल्हा क आमच्या संस्थेच्या इमारती मध्ये आहे. तुझी पात्रता काय आहे. त्यावेळी घरातील सर्व महिला व पुरुषांच्या बोगस सह्या काकडे यांनी स्वतः करुन पैशाची मागणी केली. आणि दम देवून बँक तून १६ लाख ९७ हजार ५०० रुपये काढून नेले. दरम्यान, गोपाळघरे यांनी माझ्यावर खोट्या सह्या करुण रक्कम काढली हे खोटे आरोप केले आहे. ही घटना २ ऑगस्ट २०२२ एक महिन्यापूर्वीची आहे. त्याने केलेल्या बोगस तक्रारी संदर्भात मी कायदेशीर कारवाई करणार आहे. या प्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करावी, सत्य परिस्थिती बाहेर येईल असे माजी अध्यक्ष व संचालक विठ्ठलराव काकडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...