आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेला दांडी:एमपीएससी परीक्षेला 1,641 जणांची दांडी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा शनिवारी जिल्ह्यातील १८ उपकेंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेला ५०११ विद्यार्थी हजर‌‌ होते, तर १६४१ विद्यार्थी गैरहजर होते, अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली.

या परिक्षेसाठी अहमदनगर शहरातील १८ उपकेंद्रावर एकूण ६६५२ उमेदवार परिक्षेस प्रवेशित होते. या परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी-५ , भरारी पथक प्रमुख-१, वर्ग १ संवर्गातील उपकेंद्र प्रमुख - १८ अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग ३ संवर्गातील एकूण ६२५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...