आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:आनंदोत्सवच्या जीवन गौरव पुरस्काराचे 16 ला वितरण ; राष्ट्रहितासाठी भरीव योगदान

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरच्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष व मथुराच्या श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष विद्यावाचस्पती स्वामी गोविंदगिरी महाराज (आचार्य किशोर व्यास) यांना सन २०२१ या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. ज्ञानेश्वरी जयंतीच्या सुमुहूर्तावर शुक्रवार दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४:३० वाजता सावेडी येथील माऊली सभागृह येथे हा समारंभ हाेईल.

स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी नगरमधून आपल्या अध्यात्मिक कार्यास सुरवात करून आज ते राष्ट्रहितासाठी भरीव योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना राष्ट्रीय स्तरावरील जीवन गौरव पुरस्कार देत आहोत. यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर योगदान देणाऱ्या ११ दिग्गज व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा बारावा पुरस्कार वितरण समारंभ आहे, अशी माहिती नगरच्या आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी दिली.

स्वामी गोविंदगिरी महाराज यांना राज्यातील महान संत मंडळांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज, प्रज्ञाचक्षू मुकुंद जाटदेवळेकर, नाशिकचे जगद्गुरु ज्ञानोबा-तुकोबा द्वाराचार्य व विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज, श्रीरामपुरच्या सरला बेटचे महंत रामगिरी महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज व देहूच्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे महाराज, आदी उपस्थित असणार आहेत.या गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यास रसिक, भाविक, राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त उषा सहस्रबुद्धे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...