आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकाच व्यक्तीच्या नावाने वेगवेगळे असलेल्या आधारकार्डांना आता लगाम लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आधार कार्ड डॉक्युमेंट अपडेट प्रकल्प मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दहा वर्ष जुनी असलेली आधार कार्ड नव्याने अपडेट केली जाणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ चार टक्केच आधार कार्ड नव्याने अपडेट झाली असून, १७ लाख ४९ हजार ८७८ आधार कार्ड नव्याने अपडेट होणार आहे. दरम्यान जिल्ह्यात एकूण ५० लाख ५९ हजार ७२१ आधार कार्ड धारक आहेत. त्यापैकी केवळ ४ टक्के नागरिकांनीच आधार कार्ड अपडेट केले आहे.
“एक व्यक्ती एक आधार कार्ड’असे धोरण राबवले जात असताना अनेक ठिकाणी एका व्यक्तींच्या नावे केवळ पत्ते बदलून अनेक आधार कार्ड तयार होत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे अनेक शासकीय योजनांचा लाभ असे बनावट आधार कार्ड धारक घेताना दिसत होते.
समितीत या विभागांचा समावेश
जिल्हाधिकारी भोसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी आधार अपडेट समितीची पहिली बैठक झाली. या समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण जिल्हा परिषद), जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक, प्राथमिक), प्रधान पोस्ट मास्टर, युआयडीएआय, जिल्हा व्यवस्थापन अग्रगणी बँक, ई गव्हर्नर्स या विभागांचा समावेश आहे.
आधार कार्ड अपडेट करावेत
ज्या आधार कार्डधारकांनी दहा वर्षात एकदाही आपल्या आधार कार्डात नाव, पत्ता, फोटो, अपडेट केले नाहीत, त्यांनी ते अपडेट करून घ्यावेत. जेणेकरून त्यांची सर्व माहिती सुरक्षित राहिल. त्यासाठी नागरिकांनी सेतू कार्यालयात जाऊन हे डॉक्युमेंट अपडेट करून घ्यावेत.''-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी.
डाॅक्युमेंट अपडेटमुळे बनावट आधारकार्डला बसणार आळा
बनावट आधार कार्ड धारकांना लगाम लावण्यासाठी सरकारने डॉक्युमेंट अपडेट प्रकल्प हे धोरण आणले असून, या नव्या प्रकल्पा अंतर्गत गेल्या दहा वर्षात ज्या व्यक्तींनी आधार कार्डमध्ये पत्ता, फोटो व अन्य बाबी नव्याने समाविष्ट केल्या नाहीत त्या नागरिकांना नव्याने समाविष्ट करता येणार आहेत.डॉक्युमेंट अपडेट यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यात शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे आधार अपडेट केले जाणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.