आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याला 1600 रुपये क्विंटलपर्यंत भाव:राहाता बाजार समितीत 17 हजार 800 कांदा गोण्यांची आवक, डाळिंबाचे भावही स्थिर

अहमदनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (2 ऑगस्ट) 17 हजार 800 कांदा गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्याला सर्वाधिक प्रतिक्विंटल 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. तर दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 750 ते 1150 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

राहाता बाजार समितीत मंगळवारी 13 हजार 800 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 750 ते 1150 रुपये, तीन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 300 ते 700 रुपये, तर गोल्टी कांद्याला प्रतिक्विंटल 600 ते 800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. जोड कांद्याला

प्रतिक्विंटल 100 ते 300 रुपये भाव मिळाला. दरम्यान, पावसामुळे कांदा खराब होण्याच्या धोक्याने शेतकरी भाव कमी असूनही कांदा विक्रीसाठी काढत आहेत. त्यामुळे बाजार समितीत आवक वाढत आहे.

डाळिंबाचे भाव स्थिर

राहाता बाजार समितीत मंगळवारी 14 हजार 986 क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो 151 ते 205 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो 91 ते 150 रुपये, तीन नंबरच्या डाळिंबाला 51 ते 90 रुपये, तर चार नंबरच्या डाळिंबाला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. मागील दोन दिवसापासून राहाता बाजार समितीत डाळिंबाचे भाव स्थिर आहेत.

बातम्या आणखी आहेत...