आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:गुलाबपुष्प देऊन दहावीच्या परीक्षार्थींचे‎ जिल्ह्यात 179 केंद्रांवर होणार स्वागत‎

नगर‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने‎ घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला गुरुवारपासून (२‎ मार्च) सुरुवात होत आहे. नगर जिल्ह्यातील १७९ परीक्षा‎ केंद्रांवर पहिल्या दिवशी मराठीचा पेपर होणार आहे.‎ तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी‎ परीक्षेच्या पहिल्या दिवशी विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांना‎ गुलाबपुष्प देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला जाणार‎ आहे.‎ जिल्ह्यात २ ते २५ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होत‎ आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम साळीमठ यांच्या‎ अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक‎ झाली.

त्यात कॉफीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी‎ साळीमठ यांच्या अध्यक्षतेखाली पथकांची नियुक्ती‎ करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी‎ अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण‎ अधिकारी (योजना), प्राथमिक शिक्षणाधिकारी व‎ प्राचार्य अशी ७ पथके नियुक्त केली आहेत.‎ दहावीच्या परीक्षेसाठी ६९ हजार ५३४ विद्यार्थी प्रविष्ट‎ असून, परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निर्धारित‎ वेळेनंतर उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात‎ प्रवेश दिला जाणार नाही. गुरुवार २ मार्चला पहिला पेपर‎ हा मराठीचा होणार आहे.‎

प्रत्येक केंद्रावर‎ पोलिस बंदोबस्त‎
दहावीच्या परीक्षेसाठी‎ तालुकास्तरावर तहसीलदार‎ गटविकास अधिकारी यांच्या‎ स्तरावरून स्वतंत्र भरारी‎ पथकांची नियुक्ती करण्यात‎ आली आहे. तसेच, परीक्षा केंद्र‎ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश‎ लागू करण्यात आले आहे.‎ त्याचबरोबर कॉपी रोखण्यासाठी‎ प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस‎ बंदोबस्त देण्यात येणार आहे.‎ परीक्षा केंद्रापासून १०० मीटर‎ परिसरात झेरॉक्स, फॅक्स दुकाने‎ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात‎ आले आहेत‌. प्रत्येक परीक्षा‎ केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या‎ पाण्याची सोय केली आहे.‎

मानसिक बळ देणार‎
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावीचे वर्ष‎ अत्यंत महत्त्वाचे असते. दहावीचा‎ पेपर आत्मविश्वासाने देता यावा,‎ विद्यार्थ्यांना मानसिक बळ मिळावे,‎ यासाठी रेसिडेन्सी हायस्कूलमध्ये‎ पेपरच्या पहिल्या दिवशी गुलाबाचे‎ फुल देऊन त्यांचे स्वागत केले‎ जाणार आहे.‎ - व्ही. के. पोकळे, प्राचार्य, रेसिडेन्शियल‎

१५ संवेदनशील केंद्रे‎
जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी १५‎ संवेदनशील केंद्र असून, पाथर्डी‎ तालुक्यात ६, शेवगाव ३, नगर शहर‎ ३, जामखेड, नेवासे, कोपरगाव,‎ श्रीगोंदे प्रत्येकी १, असे १५‎ संवेदनशील केंद्रे आहेत. या केंद्रांवर‎ परीक्षेदरम्यान कॉपीचा होऊ नये,‎ यासाठी व्हिडिओ चित्रीकरण केले‎ जाणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...