आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअत्यावश्यक सेवा देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मनोरंजनासोबतच आपसात स्नेहभाव वृद्धिंगत होण्याबरोबर ग्राहकसेवेसाठी नवऊर्जा मिळणार आहे. ही नवऊर्जा दैनंदिन कार्यात त्यांनी वापरून कंपनीचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांनी केले.
महावितरणच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मचाऱ्यांसाठी “प्रकाशपर्व” कार्यक्रम अहमदनगर मंडळातर्फे सहकार सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यकारी अभियंते दीपक लहामगे, लक्ष्मण काकडे, अनिल थोरात, अजय भंगाळे, कैलास जमदाडे, राहुल गवारे व विष्णू नवले हे उपस्थित होते.
सहाय्यक अभियंता राजेंद्र धाडगे यांनी निर्मित केलेली एमएसईबी ते महावितरण कंपनीचा प्रवास चित्रफितीच्या माध्यमातून मांडला. कॉमेडियन मकरंद टिल्लू यांच्या कार्यक्रमाने सुरुवात हास्य कल्लोळाने झाली. त्यानंतर हरहुन्नरी कलाकार राजेंद्र टाक यांच्या संगीत तांबोल्यात सहभागी होऊन सुमधुर गाण्यांचा कर्मचारी अधिकारी व कुटुंबाने आनंद लुटला. यावेळी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळून दोन वहिनींनी पैठण्या जिंकल्या.
त्यानंतर रामनगरी हा नगरी भाषेतील विनोदी एकपात्री कार्यक्रम नाना मोरे यांनी सादर केला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे 17 व्या वर्धापना निमित्त लकी ड्रॉ मध्ये एकूण 17 बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन अभिजित रासकर व सागर अधापुरे यांनी केले. कार्यक्रमात व्यवस्थापक ललित खाडे व रेणुका भिसे व अनुदेशक कपिल रोडे यांच्यासह महावितरणच्या आजी माजी कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबिय सुद्धा उपस्थित होते.
रॅलीद्वारे केले वीज बचतीचे आवाहन
महावितरणच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त मंडळातर्फे जनजागृतीसाठी अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असलेली मोटारसायकल रॅली आयोजित केली होती. विद्युत भवन येथे अधिक्षक अभियंता सुनील काकडे यांच्या उपस्थितीत या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. विद्युत भवन येथून सुरुवात झालेली ही रॅली शहरातील विविध मार्गे जनजागृती करीत रॅलीचा समारोप करण्यात आला. वीज बिल भरणा व वीज बचत अशा विविध माहितीचे फलक कर्मचाऱ्यांनी दाखवत जनजागृती करीत व वाहतुकीचे सर्व नियम पाळून शिस्तबद्ध पद्धतीने या मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. यामध्ये अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.