आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी:अहमदनगर जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींच्या 18 जागा बिनविरोध; 107 जागांसाठी उमेदवारी अर्जच दाखल नाही

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निधन, राजीनामा, अपात्र व अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील 96 ग्रामपंचायतीच्या 142 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. 142 जागांपैकी 107 जागांसाठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नाही. तर अन्य 18 जागा या बिनविरोध झाल्या असून, पोटनिवडणूक जाहीर झालेल्या 9 ग्रामपंचायतीच्या 11 रिक्त जागांसाठी सोमवारी 5 जूनला मतदान घेण्यात येणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील 96 ग्रामपंचायतीच्या 142 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. 13 मे पासून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अर्जाची छाननी 23 मे ला झाली होती. 25 मे पर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली होती. 96 ग्रामपंचायतींच्या 142 जागांपैकी 107 जागांसाठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नाहीत. तर 18 जागा या बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 9 ग्रामपंचायतीच्या 11 रिक्त जागांसाठी 5 जूनला मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार असून 6जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...