आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता:रिमोटचा वापर करुन चोरली तब्बल 1.94 कोटींची वीज! ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीजचोरीसाठी लढवण्यात येणाऱ्या क्लृप्त्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असून विजेची चोरी करणारे महावितरणपेक्षा तंत्रज्ञानात एक पाऊल पुढे आहेत. सध्या रिमोटचा वापर करून वीजचोरी करण्याची क्लृप्ती मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. असाच प्रकार कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे उघडकीस आला आहे. मीटरमध्ये छेडछाड करून रिमोटचा वापर करुन तब्बल १.९४ कोटींची वीज चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाचे कार्यकारी प्रदीप सावंत यांनी कर्जत ठाण्यात फिर्याद दिली आहे.

छत्रपती जिंनिंग ॲन्ड प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेडचे वीज वापरदार राहुल भरत पवार व दादासाहेब अण्णासाहेब बांदल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. १६ जून रोजी सावंत व भरारी पथकातील सहाय्यक अभियंता गफ्फार शेख, कनिष्ठ अभियंता आशिष नावकार, चाचणी विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुधीर किनगे, सहाय्यक अभियंता धनंजय एकबोटे, तंत्रज्ञ दत्तात्रय पोटकुले यांनी मिरजगाव परिसरातील शिवाचा मळा रोड येथे छत्रपती जिंनिंग ॲन्ड प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत जाऊन वीज मिटरची तपासणी केली. यात मीटरला येणारा इनकम्पिंग करंन्ट हा कमी प्रमाणात नोंद होईल व त्यामुळे मीटरमध्ये कमी वापराची नोंद होईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे आढळले. घटनास्थळावरून मीटर व त्यात टाकलेले रिमोट सर्किट भरारी पथकाने ताब्यात घेतले.

बांदल यांनी वीज वापराची नोंद कमी प्रमाणात होईल अशी व्यवस्था करुन १७ महिन्यात ११ लाख १६ हजार ७४३ युनिट विजेची चोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने व त्याचे १ कोटी ९४ लाख ८२ हजार ८५९ रुपये न भरल्याने सावंत यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...