आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी योजना:32 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 19.92 कोटींचे प्रोत्साहन अनुदान

दीपक कांबळे | नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी ३७ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी ऑक्टोबरमध्ये जाहीर झाली होती. आतापर्यंत त्यापैकी ३२ हजार ४५८ शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर १९ कोटी ९२ हजारांचे प्रोत्साहनपर रकमा जमा झाल्या आहेत. उर्वरित नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दुसरी यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत निमयीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय २९ जुलै २०२२ मध्ये सरकारने घेतला होता. या योजनेंतर्गत बँकांनी असे २ लाख ३ हजार ७६९ शेतकऱ्यांचे कर्जखाते पोर्टलवर अपलोड केले होते. त्यापैकी पहिली यादी ३७ हजार १६४ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.

त्यानुसार ३६ हजार ४९४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले तर ५५० शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण प्रलंबित आहे. त्यापैकी३२ हजार ४५८ शेतकऱ्यांच्या खात्यात १९ कोटी ९२ हजाराच्या प्रोत्साहनपर रकमा जमा झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण राहिले आहे, त्यांनी बँकेत अथवा आपले सेवा केंद्रात प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने केले आहे.

१.६६ लाख शेतकरी प्रतीक्षेत
जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ७६९ शेतकऱ्यांनी नियमीत कर्जफेड केली होती, त्यांचे खातेही अपलोड झाले होते. त्यापैकी ३७ हजार १६४ शेतकऱ्यांचीच पहिली यादी जाहीर झाली होती. त्यांना मदत पोहोच होण्यासही सुरूवात झाली. परंतु, उर्वरीत १ लाख ६६ हजार ६०५ शेतकऱ्यांवर दुसऱ्या यादीची वाट पाहण्याची वेळ आली आहे.

सहकार आयुक्तांच्या सूचना
सहकार आयुक्त व राज्य निबंधक सहकारी संस्था यांनी, १ डिसेंबरला आधार प्रमाणिकरण तत्काळ पूर्ण करणे, तसेच पोर्टलवर निर्माण झालेल्या प्रलंबित तक्रारी निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित आधार प्रमाणिकरणाला गती द्यावी लागणार आहे.

प्रोत्साहन लाभासाठी निकष?
२०१७ - २०१८ व २०१९-२०२० या तीन वर्षांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृती व ग्रामीण बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची कोणत्याही दोन वर्षात मुद्दल व व्याजासह परतफेड करणारा वैयक्तिक शेतकरी, हा निकष विचारात घेण्यात आला आहे.

आधार प्रमाणिकरण अनिवार्य
पहिल्या यादीतील राहिलेल्या सुमारे ५५५ शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण तत्काळ करून घ्यावे. जर शेतकऱ्याचा आधार क्रमांक चुकीचा असेल किंवा रक्कम कमी वाटत असेल त्यांनी तत्काळ तालुका व जिल्हास्तर समितीकडे तक्रार दाखल करावी. आधार प्रमाणिकरणाशिवाय रक्कम देता येणार नाही.''
गणेश पुरी, जिल्हा उपनिबंधक.

बातम्या आणखी आहेत...