आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:धूमस्टाइल मोबाइल हिसकावणारे 2 आरोपी जेरबंद ; जिल्ह्यात असे प्रकार वाढत आहे

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवरुन येऊन धूमस्टाइलने नागरिकांच्या हातातील मोबाइल पळवणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पारनेर येथील कोमल दत्तात्रय जाधव या घरी जाण्यासाठी गाडीची वाट पाहत रस्त्यावर उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. जिल्ह्यात असे प्रकार वाढत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हागुन्हा अब्दुल खान (रा. तपोवन, नगर) याने केल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ योगेश सातपुते, मेघराज कोल्हे व पोहेकॉ संभाजी कोतकर यांनी तपोवन येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. आरोपी खान हा छत्रपती नगर येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...