आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेचे उत्पादन:अहमदनगर विभागात 2 कोटी 57 हजार 553 क्विंटल साखरेचा गोडवा, विक्रमी उसाचे गाळप

अहमदनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा 28 कारखान्यांतून आतापर्यंत एकूण 2 कोटी 26 हजार 410 टन उसाचे गाळप करून 2 कोटी 57 हजार 553 क्विंटल साखरेचे उत्पादन काढले. साखर उतारा 10.02 आला. यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील 23 सहकारी व खासगी कारखान्यांतून 1 कोटी 85 लाख 1 हजार 229 टन उसाचे गाळप करून 1 कोटी 85 लाख 8 हजार 158 क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

अहमदनगर विभागात नाशिकमध्ये 5, तर अहमदनगर जिल्ह्यात 23 कारखान्यांतून नोव्हेंबर 2021 पासून गाळप हंगामाला सुरुवात झाली. अहमदनगर जिल्ह्याची राज्यात सहकारी कारखानदारीचा जिल्हा म्हणून ओळख आहे. अहमदनगर जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र 1 लाख 64 हजार हेक्टर आहे. जिल्ह्यात 8 जून अखेर 1 कोटी 85 लाख 1 हजार 229 टन उसाचे गाळप झाले. तर 1 कोटी 85 लाख 8 हजार 158 क्विंटल साखरेची निर्मिती झाली.

अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांत ज्ञानेश्वर कारखान्याने सर्वाधिक 16 लाख 59 हजार 470 टन गाळप केले. यातून 16 लाख 99 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन काढले

खासगी कारखान्यांत सर्वाधिक गाळप कर्जत तालुक्यातील अंबालिका शुगरने 19 लाख 51 हजार 160 टन गाळप करून 21 लाख 650 क्विंटल साखरेचे उत्पादन काढले.

नाशिक जिल्ह्यातील 5 साखर कारखान्यांनी 15 लाख 25 हजार 182 टन गाळप करून 15 लाख 49 हजार 395 क्विंटल साखरेचे उत्पादन काढले.

अहमदनगर विभागात उच्चांकी गाळप

अहमदनगर विभागात या हंगामात उसाचे उच्चांकी गाळप झाले. अहमदनगर जिल्ह्यातील गाळप हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. सध्या फक्त श्रीरामपूरच्या अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध असल्यामुळे या कारखान्याचा गाळप हंगाम सुरू आहे. विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 2 कोटी 26 हजार 410 टन गाळप झाले, अशी माहिती नगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचे वरिष्ठ लेखा परीक्षक एस. बी. पवार यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील गाळप हंगाम पूर्ण

नाशिक जिल्ह्यातील 5 साखर कारखान्यांनी 15 लाख 25 हजार 182 टन गाळप करून 15 लाख 49 हजार 395 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गाळप द्वारकाधीश या खासगी कारखान्याने सुमारे 7 लाख 17 हजार 10 टन गाळप करून 7 लाख 15 हजार 940 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. सहकारीत सर्वाधिक गाळप दिंडोरी येथील कादवा सहकारी कारखान्याने 4 लाख 25 हजार 543 टन गाळप करून 4 लाख 79 हजार 800 क्विंटल साखर निर्मिती केली. नाशिकमधील गाळप हंगाम पूर्ण झाला.

बातम्या आणखी आहेत...