आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमुक्ती‎:कोपरगावातील 720 शेतकऱ्यांच्या‎ खात्यावर 2 कोटी 80 लाख रुपये वर्ग‎

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर‎ शिंदे-फडणवीस शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या‎ शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती‎ प्रोत्साहन अनुदान योजने अंतर्गत प्रत्येकी ५० हजार‎ रुपयांचा लाभ दिला असून पहिल्या टप्प्यातील ७२०‎ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर २ कोटी ८० लाख ४ हजार‎ ४५५ रुपये जमा केले आहेत. याकामी भाजपच्या प्रदेश‎ सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे व जिल्हा‎ सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सातत्याने‎ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.

मुख्यमंत्री‎ एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या‎ गतिमान सरकारने शेतकरी हिताच्या दृष्टीने प्रोत्साहन‎ अनुदान वितरणाची प्रक्रिया वेगाने राबवली असून‎ दरम्यानच्या काळात निवडणूक आचारसंहिता हा‎ विलंबाचा काळ वगळता सदर अनुदान वितरणाचे काम‎ वेगाने होते आहे. या रक्कमेचा शेतकऱ्यांना निश्चित‎ आधार होणार आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार‎ संघातील अशा लाभार्थी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचे‎ संचालक विवेक कोल्हे यांनी कागदपत्रांची पूर्तता‎ करण्याबाबत आवाहन काही दिवसांपूर्वी केले होते.‎ त्याच आधारे वर्तमान स्थितीत ७२० शेतकऱ्यांच्या‎ खात्यावर ही रक्कम जमा झाली. उर्वरित पात्र लाभार्थी‎ शेतकऱ्यांच्याही खात्यावर नियमित कर्ज फेड अनुदान‎ रक्कम जमा करण्याबाबतचा पाठपुरावा माजी आमदार‎ स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक‎ कोल्हे यांच्या वतीने सुरू आहे.‎

बातम्या आणखी आहेत...