आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास:प्रभाग आठमधील कामांसाठी २ कोटींचा निधी; महापौर शेंडगे यांची अनिल बोरुडेंसह नागरिकांना भेट

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरुडे कुटुंबीयांचा सामाजिक, स्नेह बंधनाचा व संस्काराचा वारसा माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी अखंडितपणे सुरू ठेवला आहे. प्रभागातील नागरिकांना वाढदिवसाचे औचित्य साधून सुमारे दोन कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून एक अनोखी भेट दिली आहे. बोरुडे यांनी गेल्या पंचवीस वर्षात नगरसेवक पदाच्या माध्यमातून विकास कामांतून शहरात आदर्श प्रभाग निर्माण केल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

सुडके मळा व बोरुडे मळा येथील रस्ता विकास कामांचा शुभारंभ महापौर शेंडगे यांच्या हस्ते झाला.यावेळी माजी विरोधी पक्षनेता संजय शेंडगे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, भीमाशंकर लांडे, नाना लांडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे, संदीप बोरुडे, विजयकुमार बोरुडे, प्रदीप बोरुडे, गोरख बोरुडे, विष्णू फुलसौंदर, नंदू बोरुडे आदी उपस्थित होते. भीमाशंकर लांडे म्हणाले, बोरुडे यांनी तळघळातील व्यक्तीपर्यंत जाऊन विकास कामे केली आहेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारे नेतृत्व प्रभागाला मिळाले आहे.

अनिल बोरुडे म्हणाले, बोरुडे कुटुंबियातून मिळालेल्या संस्काराची शिदोरी बरोबर घेऊन व प्रभागातील नागरिकांच्या प्रेमामुळे सामाजिक काम करण्याची संधी मिळाली आहे. केलेल्या विकास कामांचे श्रेय हे जनतेला आहे. महापौर शेंडगे यांनी सुडके मळा येथील रस्ता कॉंकटीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. तसेच बोरुडे मळा येथील लक्ष्मी माता मंदिर रस्त्याची कामही सुरू झाले आहे. प्रभागामध्ये नागरिकांना मनोरंजनासाठी व लहान बालकांना खेळण्यासाठी सुमारे दहा उद्यानांची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...