आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:किराणा साहित्य चोरणारे 2 चोरटे जेरबंद

राहाता11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता शहरातील भर वस्तीत असलेल्या आर. के. ट्रेडिंग या किराणा दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून १ लाख ८७ हजार रुपये किराणा साहित्याची चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व राहाता पोलिसांनी संयुक्त तपास करून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या खाद्यतेलाच्या डब्यांपैकी सुमारे ४० हजार २०० रुपये किमतीचे तेलाचे २० डबे व किराणा साहित्य चोरून नेण्यासाठी वापरलेली चार चाकी गाडी हस्तगत केली.

या घटनेतील चोरट्यांची नावे निष्पन्न झाले. दोन जणांना ताब्यात घेतले आहे तर दोन आरोपी फरार असल्याची माहिती राहाता पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. शहरातील शनि चौकालगत असलेले आर के ट्रेडिंग हे किराणा विक्रीचे दुकान व गोडाऊनमधून १६ रोजी चोरट्यांनी छताचे पत्रे उचकटून चोरी केली होती. यात रोकड व गोडतेलाचे डबे गोडतेलाचे बॉक्स, काजू, बदाम हे साहित्य चोरून नेले. दुकान मालक विरेश रुणवाल यांनी राहाता पोलिसात फिर्याद दाखल दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी एका संस्थेत आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर संबंधित आरोपीला विश्वासात घेऊन त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने या चोरी बाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांना चोरीचा तपास करणे अधिक सोपे गेले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सोपानराव गोरे, हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब फोलाणे, पोलिस हेड कॉन्स्टेबल गावडे, पोलिस नाईक संतोष लोंढे, पोलिस नाईक भिमराज खरसे, पोलिस नाईक, दीपक शिंदे, कॉन्स्टेबल जालिंदर माने, कॉन्स्टेबल गायकवाड, उपनिरीक्षक संतोष पगारे, हेडकॉन्स्टेबल दिलीप तुपे, सतीश आवारे यांनी तपास करून या चोरीतील एक आरोपीस शहरात गुरुवारी सापळा रचून अटक केली. आरोपीकडून खाद्य तेलाचे १५ लिटरचे २० डबे सुमारे ४० हजार २०० रुपये किमतीचा हा मुद्देमाल व चोरीत वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली.

बातम्या आणखी आहेत...