आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:संगमनेरात 2 हजार 569 जनावरांना लम्पीची बाधा

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी वर्गासह पंचायत समिती प्रशासन चिंतेत आहे. तालुक्यात जवळपास १ लाख ७४ हजार ३५९ पशुधनाची संख्या आहे. पैकी २ हजार ५६९ जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. १ हजार ४११ जनावरे बरी झाली असून १३८ जनावरे दगावली आहे. प्रतिबंध व जनावरांची काळजी हाच सर्वोत्तम उपाय असल्याने घाबरून जाऊ नये. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत असून तालुक्यात फिरती दक्षता पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटांमध्ये दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून रोगाचा समुळ नायनाट करण्यासाठी जलद गतीने पावले उचलली जात आहेत. दक्षता समिती गावोगाव जाऊन बाधित जनावरांची काळजी घेत आहे. मंगळवारपर्यंत तालुक्यातील १ लाख ७ हजार ५०५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, पशुधन विकास अधिकारी परिस्थितीजन्य उपाययोजना करत आहेत. बाधित जनावरांसाठी ड्रग बँका सुरु करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...