आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशुल्क तिरंगा ध्वज उपलब्ध:शहरात तिरंगा ध्वज विक्रीसाठी 20 केंद्र उभारणार

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमात राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत नगर शहरात ७५ हजार ९६० घरांवर तिरंगा ध्वज फडकवण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. नागरिकांना सशुल्क तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यासाठी शहरात २० ठिकाणी विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. सहाय्यक आयुक्त सचिन राऊत यांची या अभियानासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने ७५ हजार ९६० तिरंगा ध्वजाची मागणी नोंदवली आहे. यातील ५१ हजार तिरंगा ध्वज शासनाकडून घेतले जाणार आहेत. तर सुमारे २५ हजार तिरंगा ध्वजाची महापालिकेमार्फत खरेदी होणार आहे. अभियानाचे नियंत्रण, प्रचार व प्रसिद्धी, वितरण, पुरवठादार निश्चितीकरण अशा चार समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त राऊत यांच्या नियंत्रणाखाली चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या प्रभाग अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

मनपातर्फे मनपा मुख्यालय, चारही प्रभाग समिती कार्यालये यासह या कार्यालयाअंतर्गत ठिकाणे निश्चित करून शहरात सुमारे २० ठिकाणी ध्वज विक्री केंद्र उभारणीचे नियोजन महापालिकेमार्फत सुरू आहे. महापालिका मुख्यालयातील केंद्रासाठी चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतर केंद्रांवर प्रभाग समिती कार्यालयामार्फत कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मनपाकडून सशुल्क तिरंगा ध्वज विक्री केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...